बस येऊन थांबते 🚌.....
पिकनिक साठी सर्व अॅकेडमी चे विद्यार्थी -विद्यार्थीनी 👬👭आले होते, त्यात ऋषी, समीर, अंकीत , मोहीत पण होते. अंकीत ने ऋषीला खुनवले. आज बोलुन च टाक की 'माझे तुझ्या वर प्रेम 😍आहे 'म्हणून , असे त्याला सुचवायचे होते.
ऋषी आपला नेहमी प्रमाणे😟 गप्प. ...घाबरट....अंकित, मोहित नेहमी ऋषीला चिडवायचे. पण आज ऋषीने पण ठरवले होते की..आज आपण आपल्या मनातले बोलून च टाकायचे समिक्षाला..
समोर समुद्रावरील 🏖सोसाट्याचा वारा येत होता..लाटांचा खळखळाट व ग्रुप च्या सर्वांचा कल्ला एकच झाला होता. बाजूला चौपाटीवर अनेक पर्यटक 🏄♀आलेले होते. भेळपुरी च्या अनेक गाड्या लागलेल्या होत्या. संध्याकाळ होत आली होती. समिक्षा व तिच्या मैत्रीणी येणार्या लाटांशी खेळण्यात मग्न होत्या. ऋषी व समीर थेट त्यांच्या कडे गेले, कारण आज ऋषीने ठरवले होते की समीक्षा ला आपल्या मनातले बोलुन टाकायचे.
दोघे ही चालत जात त्यांच्या पर्यंत गेले, ऋषी व समीक्षा ची नजरानजर झाली, ऋषी काही बोलण्याच्या प्रयत्नात. ........तसाच मागे वळला परत माघारी 🚶🚶🚶आला.....
मोहित, अंकीत पोट धरुन हसू🤭😂 लागले. ...किती भीत्रा आहेस म्हणून चीडवायला लागले. ..शेवटी पिकनिक वरून सर्वजण घरी परतले. अॅकेडमी चे ते जुने दिवस आठवत असताना अचानक दारावरची बेल वाजली...ऋषी त्या जुन्या आठवणी तुने बाहेर आला, त्याने उठून दरवाजा🚪 उघडला, तर समोर अंकीत, मोहित व समीर. ..🚶🚶🚶
आज ऋषी व मोहित, ऋषीसाठी मुलगी 🧚♀बघायला जाणार होते. ...ऋषीच्या बाबांचा फोन📞 आला....ऋषी घाईने सर्व आवरले, व तयार झाला, मोहित ने गाडी 🚗काढली. मोहित ने गाडी मध्ये समीक्षा बद्दल विषय काढला.ऋषीने तो टाळला , कारण त्याने आता त्या जुन्या आठवणी त न रमता पुढे जाण्याचे ठरवले होते. तो पुर्णपणे तिला विसरू पाहत होता. मोहित ने त्याला चीडवण्याची संधी सोडली नव्हती. ...घाबरट म्हणून. ..दोघेही हसले! 😂व केव्हा मुलीच्या घरी पोहोचले कळलेही नाही.
मुलीच्या घरच्यानी दोघांचे स्वागत🤝 केले...मुलगी पाहण्याचा कार्यक्रम. ...मुलगी समोर पोहे 🧚♀घेऊन आली...मोहित ने ऋषीला खुनवले. ...ऋषीने वरती बघीतले तर समोर. ............समीक्षा. ...........
✒✒✒--अनामिक लेखक

Comments
Post a Comment